सध्या तरी college सुरु झालय आणि नोकरी ही मिळाली आहे. मग म्हणावा तसा आराम. फक्त क्लास आणि sessionals चा अभ्यास. या सगळ्यात भर म्हणजे नवीन season सुरु करायचे. काही तरी time pass म्हणून. सगळ्या नावाजलेल्या English sitcom बघून झाल्या आणि काही तरी वेगळा म्हणून एका मराठी daily soap ने नादी लावले. “एका लग्नाची दुसरी गोष्ट ” सम्पूर्ण मराठी तरुणायीला विचार करायला लावणारी ही serial अर्थात माझ्या विचारशक्तीला ही प्रेरणा देणारी ठरली.
contract marriage केलेलं हे जोडपं अगदी नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडतं आणि घरातील मोठी व्यक्ती म्हणून त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करणारी माई एका पर-पुरुषाला त्या दाम्पत्यांच्या आयुष्यात आणते. ती व्यक्ती माईने रचलेल्या नाटकाचा एक भाग आहे. फक्त त्यांच्यातील प्रेमाला अस्तित्व देण्यासाठी. तर या नवीन पात्राचे नाव “अभिर रानडे ” सगळे व्यवस्थित ठरल्याप्रमाणे होत असताना अचानक अभिर माईला अगदी मोलाचा उपदेश देऊन श्याम आणि राधाच्या आयुष्यातून कायमचा निघून जातो.
अर्थात प्रत्येक वेळी नाती दुरावताना एकच गोष्ट समजणे महत्वाचे वाटते कदाचित ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील ‘अभिर रानडे’ होती. 🙂
Comments