top of page

माझं इंद्रधनुष्य!

रिमझिम पावसासारखी वेळ सरत सुर्यप्रकाशातल्या रानमय आयुष्यात हिरवळीच्या पार्श्वभुमीसारखे प्रसन्न दिवस आठवत तू आलास असा जसा इंद्रधनुच


प्रेमाचा प्रत्येक रंग अनोखा ज्याने जसा पाहीला तसा त्या प्रत्येक रंगाची इच्छा करत तू आलास असा जसा इंद्रधनुच


आयुष्याच्या चढ आणि उतारात धैर्य आणि धीर असताना शिकत नकळत एक कळी खुलवत तू आलास असा जसा इंद्रधनुच


ज्या रंगाचा सर्वाना वाटेल हेवा तो रंग घेऊन ही तू आला तुझ्या प्रत्येक रंगाची ठेवतेय आठवण कारण, तू आलास असा जसा इंद्रधनुच


त्या प्रत्येक आठवणीतला रंग दिवसात भरतेय तू नसताना आसपास अजुन एकदा पाऊस पाहतेय कारण, तू आलास असा जसा इंद्रधनुच


पावसाच्या प्रत्येक थेँबाने सुर्याच्या प्रत्येक किरणाने बनवले जरी तुजसारखे अनेक पण, तू आलास असा जसा इंद्रधनुच माझा

rainbow

witnessed this scenic beauty in Bhandat Thatch, one of the camps in Sar pass trek


1 view0 comments

Recent Posts

See All

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page